चित्रकूट : वडिलांनी आपल्या १५ वर्षांच्या मुलीवर घरात बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलायं. वडिलांनी आपल्या घरामध्येच मुलीला पकडलं आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने मोठमोठ्याने आवाज केल्यानंतर आरोपीची पत्नी म्हणजेच मुलीची आई तिथे पोहोचली पण पत्नीला पाहून आरोपी पळून गेला. उत्तर प्रदेशमधील चित्रकूटमध्ये हा प्रकार समोर आलायं.


आरोपी फरार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी यूपी पोलिसांनी एका व्यक्तिवरूद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आपल्याच घरात पित्याने बलात्कार केल्याचे चित्रकूट जिल्ह्याच्या कोतवाली कर्वीचे पोलीस निरीक्षक अनिल सिंह यांनी रविवारी सांगितले. मुलीचे ओरडणे ऐकून तिची आई घरात आली पण आरोपी जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाल्याचे त्यांनी सांगितले.


मुलीची वैद्यकिय चाचणी  


मुख्य न्यायिक दंडाधिकारी(सीजेएम) ने सीआरपीसी कलम १५६ (३) नुसार शनिवारी आरोपी बापाविरूद्ध मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. मुलीची वैद्यकिय चाचणी करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.