नवी दिल्ली : बाप - लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटणार उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलंदशहरमध्ये एका वडिलाने आपल्या मुलीला दूधामध्ये झोपेची गोळी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. असी तक्रार नोंदवण्यात आली आहे. या पित्याने आपल्या मुलीला अशा पद्धतीने वागणूक दिल्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा आहे. हा प्रकार बुलंदशहरच्या जवळील भोपुर गावातील ही घटना आहे. 


काय आहे हा प्रकार?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई आणि नातेवाईकांसोबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना बुधवारी घडली असून मुलीने दिलेल्या जबाबात असे सांगितले आहे की, वडिलांनी तिला दूध पिण्यासाठी दिले होते. ज्यामध्ये त्यांनी नशाचा पदार्थ टाकला होता. आरोपी वडिलाच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी देखील या प्रकारात चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. 


या घटनेमुळे पुन्हा एकदा या नात्याला काळीमा फासली गेली आहे. या प्रकारामुळे उत्तर प्रदेशात एक आक्रोष निर्माण झाला आहे.