Father Son Emotional video: कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं आणि प्रेमाची व्याख्या ज्यासमोर अपुरी ठरते, ते नातं म्हणजे बाप आणि लेकाचं नातं. आई मुलाचं नातं सर्वांना दिसतं, अनेक लेख, कथा, कांदबऱ्या यावर लिहिल्या गेल्यात. मात्र, बापावर लिहिलेलं लिखाणं शोधणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्याचा प्रकार. असं म्हणतात, काही व्यक्ती लांब गेल्यावर त्याची किंमत कळते. त्याचा प्रत्यय घरापासून लांब राहणाऱ्या मुलाला किंवा मुलीला येत असावा. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. (Father dropping son at railway station walking with train father son emotional video viral on social media trending news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या आई-वडिलांसाठी ती लहानच असतात. त्यामुळे घरापासून लांब राहणाऱ्या मुलांसाठी त्यांचा जीव तळमळत असतो. वरून कठोर असलेला बाप आतून किती हळवा असतो, याची प्रचिती दर्शविणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. शिक्षणानिमित्त किंवा कामानिमित्त एकमेकांपासून लांब राहिलेला एक मुलगा पुन्हा परतीच्या मार्गावर जात असतो. त्यावेळी त्याचे वडील थंडीत त्याला सोडवायला येतात.


आणखी वाचा - Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या लेकीचा VIDEO व्हायरल, आजारी असतानाही मुंडे मुलीला म्हणतात...


वडील मुलाला सोडवायला रेल्वे स्टेशनवर आले. त्यावेळी त्यांनी आपल्या लाडक्या लेकाला ट्रेनमध्ये बसवलं. वडील प्लॅटफॉर्मवर उभे होते आणि मुलगा ट्रेनच्या दरवाज्याच उभा होता. थोड्या वेळात रेल्वे सुटते. त्यावेळी वडिलांना गहिवरून आलं. जशी ट्रेन सुटते तसं वडील रेल्वेसोबत चालताना दिसतात आणि हाताने इशारा करून काळजी करू नकोस, नीट जा, असं देखील डोळ्यांच्या शब्दात सांगताना दिसत आहे.


पाहा Video - 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Pawan Sharma (@pwn.sharma)


दरम्यान, प्रत्येक मुलासाठी आपला बाप ग्रेट असतो. का कुणास ठाऊक? कोणतं प्रेम दोघांची गाठ सुटता सोडत नाही. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचं दु:ख दोघांना सोडू देत नाही. पण काय करावं...जबाबदारीचं ओझं या नात्यात अधिक गोडवा घेऊन येतं. मुलाला वाईट वाटू नये म्हणून आपल्या भावना दाबून ठेवणाऱ्या प्रत्येक बापाला कडक सॅल्यूट!