नवी दिल्ली : बँक ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील (Fix Deposit) व्याजदरात वाढ केली आहे. तुमची या बँकेत FD असेल, तर आता FD मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला अधिक परतावा मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HDFC आणि ICICI या खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँका आहेत. या बँकांची स्पर्धा थेट सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाशी (SBI) आहे. आता या दोन्ही बँकाही प्रचंड नफा (Fixed Deposit Interest Rates) देत आहेत.


कोणाला किती परतावा मिळतो?


व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.50 टक्के ते 5.50 टक्के व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3% ते 6.25 टक्के व्याज असते. हे नवीन दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत.


यासोबतच ICICI बँकेनेही आपल्या व्याजदरात बदल केला आहे. ICICI बँक 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 2.5 टक्के ते 5.5 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 बेसिक पॉइंट्स (bps) जास्त व्याजदर आहेत.