VIDEO: टोल कर्मचारी महिलेचे तोंड दाबले, केसाना पकडून खुर्चीसह खाली पाडले, महिलेनेच केली अमानुष मारहाण
Toll Plaza Viral Video Women: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ग्रेटर नोएडायेथील हा व्हिडिओ असून एक महिलाच महिला कर्मचाऱ्याला मारहाण करत आहे.
Toll Plaza Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ चर्चेत आहे. महिला टोल कर्मचाऱ्याला एक महिला बेदम आणि अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. इतकंच, नव्हे तर ही महिला टोल कर्मचारी महिलेला मारहाण करत असताना कोणीही तिला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video Viral) सध्या व्हायरल होत आहे. तर, ग्रेटर नोएडातील ही घटना असून पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. (TollPlaza Viral Video)
टोलनाक्यावरच वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादरी ठाणे परिसरातील लोहाली येथील टोलनाक्यावरील हा प्रकार आहे. टोलनाक्यावरुन जात असताना एका कारमधील प्रवाशाने तो स्थानिक रहिवाशी असल्याचे सांगत टोल भरण्यास नकार दिला. त्यावर महिला कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले. मात्र त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला व तिथेच हुज्जत घालू लागला.
केसांना पकडून खूर्चीसह खाली पाडले
टोल कर्मचारी आणि कारमधील व्यक्तीचा वाद सुरु असतानाच त्याच्या बाजूला बसलेली महिला संतापली. रागाच्या भरात तिने फिल्मी स्टाइलमध्ये टोलबूथमध्ये बसलेल्या महिलेच्या जवळ गेली. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी महिलेने तिच्या केसांना पकडून तिला जाब विचारु लागली. नंतर तिचा जबडा पकडून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर, आरोपी महिलेने अमानुषपणे तिच्या केसांना पकडून खुर्चीवरुन खाली पाडले आणि तिला पुन्हा मारहाण करु लागली. मात्र तिला वाचवण्यासाठी किंवा आरोपी महिलेला थांबवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
महिला कर्मचारी सून्नपणे बसून राहिली
अचानक घडलेल्या या प्रकारामुळं पडीत महिला कर्मचारी भांबावली होती. ती प्रतिकार करण्याच्या मनस्थितीतदेखील नव्हती. महिलेने तिला खूर्चीवरुन खाली पाडल्यानंतर ती सून्नपणे काहीवेळ तशीच बसून राहिली होती. हा सर्व थरार व्हिडिओत कैद झाला आहे. बुथच्या बाहेर असलेले पुरुष महिलेला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी केली अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दादरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.