17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत पळाली महिला टीचर, आंतरधर्मीय असल्याने वाद; म्हणाल्या- आमच्यामुळं दंगली करू नका
राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. 17 वर्षाच्या विद्यार्थीनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली आहे. या दोघी आंतरधर्मीय असल्याने बिकानेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात love jihad चा देखील आरोप केला जात आहे. या दोघी फरार झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद देखील पाळला होता. मोठा वादंग उठला असतानाच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्यामुळं दंगली करू नका असं अवाहन त्यांनी या व्हिडिओतून केला आहे.
Bikaner News : राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. 17 वर्षाच्या विद्यार्थीनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली आहे. या दोघी आंतरधर्मीय असल्याने बिकानेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात love jihad चा देखील आरोप केला जात आहे. या दोघी फरार झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद देखील पाळला होता. मोठा वादंग उठला असतानाच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्यामुळं दंगली करू नका असं अवाहन त्यांनी या व्हिडिओतून केला आहे.
नेमक काय आहे प्रकरण?
बिकानेर जिल्ह्यातील श्री डुंगरगड तालुक्यातील हे प्रकरण आहे. एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यकर्त असलेल्या महिलेवर 17 वर्षांच्या विद्यार्थींनीचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शिक्षिकेचा विद्यार्थीनीवर जीव जडला होता. मागील दोन महिन्यांपासून यांच्यात प्रेमसंबध सुरु होते. शुक्रवारी या शिक्षिकेने मुलीला पळवून नेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
CCTV कॅमेऱ्यात दिसल्या दोघी जणी
जयपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसून दोघी जणी रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी जयपूर रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी CCTV फुटेजमध्ये दोघी जणी रेल्वेस्थानकारवर दिसल्या. या दोघी शेवटच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दिसल्या. यानंतर दोघे कुठे गेले आहेत याचा अद्याप सुगावा लागलेला नाही.
दोघी जणी बेपत्ता झाल्यापासून मोठा वाद
या दोघी जणी बेपत्ता झाल्यापासून मोठा वाद निर्माण झाला. हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला. यावरुन वाद सुरु असतानाच या दोघींनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. साडे चार मिनीटांचा हा व्हिडिओ आहे. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही एकच्या मर्जीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आमच्यावरुन दंगली करू नका असा अवाहन या दोघींनी या व्हिडिओद्वारे केले आहे.