बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुक
EPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
EPFO Interest Rate Hike: अर्थसंकल्पाच्या आधीच 7 कोटी EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक पीएफबाबत मोठी घोषणा केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO ठेवींच्या व्याजात वाढ करण्यात मान्यता दिली आहे. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्येच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघनेनेन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता, याला आता वित्त मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT)ने फेब्रुवारीमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 साठी पीएफवरील व्याज दरात वाढ होण्याची घोषणा केली होती. पीएफवरील व्याज दर 8.15 टक्क्यांनी वाढून 8.25 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. सीबीटीच्या निर्णयानंतर 2023-24 साठी ईपीएफवरील व्याज दराच्या निर्णयाला मंजुरी मिळावी यासाठी अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आलं होतं. आता या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
मागील वर्षी 28 मार्च रोजी ईपीएफओने 2022-2023 साठी कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ)वर 8.15 टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढीची घोषणा केली होती. मार्च 2022 मध्ये ईपीएफओने जवळपास 7 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा झटका गेत 2021-22 साठी व्याज दर कमी करुन गेल्या चार दशकातील सर्वात निच्चांकी स्तरावर 8.1 टक्के इतक होते. यापूर्वी 2020-21 मध्ये व्याजदर 8.5 टक्के इतका होते.
व्याज कधी मिळते?
EPFO प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ अकाउंटअतर्गंत व्याजदराबाबत घोषणा केली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीअंतर्गंत जवळपास 7 कोटी कर्मचारी रजिस्टर आहेत. ईपीएफच्या व्याजदरांबाबत अंतिम निर्णय हा अर्थमंत्रालयांकडून घेतला जातो. पीएफ अकाउंटमध्ये व्याज हे दरवर्षी 31 मार्च रोजी जमा होते.
पीएफचा बॅलेन्स कसा चेक कराल?
पीएफचे पासबुक किंवा बॅलेन्स चेक करण्यासाठी तुम्ही Umang च्या वेबसाइट किंवा अॅपवरही जाऊ शकता. या अॅपवर तुम्हाला 127 वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळतो. Umang अॅप भारत सरकारने बनवलेले मोबाइल अॅप आहे. हे अॅप ऑल इन वन सिंगल, यूनिफाइड, सुरक्षित, मल्टी चॅनल, मल्टी लॅग्वेजची सुविधा युजर्सना देते.
EPFO पोर्टलवर पण बघता येणार बॅलेन्स
पीएफचा बॅलेन्स चेक करण्यासाठी तुम्ही EPFOच्या अधिकृत पोर्टलवरही बघू शकता. त्यासाठी https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या अधिकृत वेबसाइटवर जात. तिथे तुमच्या होमपेजवर EMPLOYEESचा पर्याय दिसेल. तिथे तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून बॅलेन्स चेक करु शकता.
SMSच्या सहाय्याने चेक करा बॅलेन्स
PF बॅलेन्स चेक करण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर AN EPFOHO ENG हे लिहून 7738299899 वर पाठवा. त्यानंतर तुमचा बॅलेन्स किती आहे याचा SMS मोबाईलवर येणार आहे.