Comedian Yash Rathi FIR: सध्या देशात स्टँडअप कॉमेडियन्सची संख्या वाढत आहे. स्टेजवर उभे राहतात आणि कोणत्याही गोष्टीवर जोक्स क्रिएट करुन शो ऑफ करण्याचा प्रयत्न करतात. यानंतर त्या कॉमेडियनचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ यश राठीचा ोसोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यश राठी जो स्वतःला स्टँडअप कॉमेडियन म्हणवतो. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील आयआयटी भिलाई येथे स्टेज शोसाठी त्याला बोलावण्यात आले होते. स्टेजवर जोक्स करण्याऐवजी यशने अश्लीलतेची हद्द ओलांडली. यशचा कॉलेजमधून व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसमोर अश्लील विनोद सांगत आहे. त्यावर कोणीही हसत नसताना त्याच्यावर उलट कारवाई केली आहे. 


शिक्षक आणि पालकही नाराज 


यश राठी यांना आयआयटी भिलाईमध्ये स्टेज शोसाठी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि मुलांचे पालक सहभागी झाले होते. कॉलेज स्टेडियम गर्दीने खचाखच भरले होते. इकडे यश राठी विनोद करून वेगवेगळ्या गोष्टींची खिल्ली उडवत होता. यावेळी त्याने हस्तमैथुन आणि पॉर्नचा उल्लेख केला तर कधी आपल्या मैत्रिणीच्या स्तनांवर टिप्पणी केली.


पालकांनी कान बंद केले


15 नोव्हेंबर रोजी यश राठी आयआयटी भिलाईच्या वार्षिक कार्यक्रमात शो करण्यासाठी आला होता तेव्हा ही घटना घडली. विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. राठीच्या शोची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये तो कधी हस्तमैथुन करण्याचा योग्य मार्ग सांगत आहे तर कधी पॉर्न पाहण्याला देखील यामध्ये सांगत आहे. एवढेच नाही तर यशने स्टेजवर आपल्या मैत्रिणीचे स्तन पाहिल्याचाही उल्लेख केला. हे अश्लील विनोद ऐकून कार्यक्रमाला उपस्थित पालक आणि शिक्षकांनी कान बंद केले. व्यवस्थापनातील कोणीतरी यशवर तत्काळ कारवाई करत त्याला मंचावरून हटवले. कॉमेडियनविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.


FIR नंतर यश राठी अडकला 


दुर्गचे पोलिस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, सोमवारी जेवरा सिरसा पोलिस ठाण्यात कॉमेडियन यश राठीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ (अश्लील कृत्ये) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अनेक तक्रारींनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम), नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि करणी सेना यांसारख्या संघटनांनी कॉमेडियनविरोधात तक्रारी केल्या आहेत. आयआयटी भिलाईचे संचालक राजीव प्रकाश यांनी एक निवेदन जारी केले आहे की, ते भविष्यात कधीही स्टँड-अप कॉमेडी शो आयोजित करणार नाहीत. या घटनेबद्दल महाविद्यालयाने दु:ख व्यक्त केले आहे.