नवी दिल्ली : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेता कमल हसन यांनी अरवाकुरीची येथे केलेल्या वादग्रस वक्तव्यानंतर आता हे विधान त्यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदूच होता, असं वक्तव्य करत हसन यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. याच वक्वयामुळे आता त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पीटीआय'च्या २९५ A अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावणे आणि विविध समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. करुर पोलिसांनी जारी  केलेल्या पत्रकात नमूद केल्यानुसार हसन यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धर्म, जात आणि भाषेच्या मुद्दयावरुन हिंसा भडकवू पाहणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यातून करण्यात आली आहे. 


दिल्ली न्यायातही हसन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा एक हिंदू होता आणि तो म्हणजे नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधी यांना मारलं होतं, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं होतं. ज्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 


'प्रचार करत असताना या संपूर्ण भागात मुस्लिमांचं प्राबल्य असल्याने आपण हे विधान करतोय असं आपल्याला वाटेल पण तसं नाही. यापूर्वीही आपण हेच विचार व्यक्त केले होते', असं कमल हसन एका प्रचारसभेदरम्यान म्हणाले होते. सभ्य भारतीयांना तिरंग्याचा अभिमान आहेच पण, त्यासोबतच त्यांना देशात समानताही हवी आहे ज्या समानतेचे आपण पुरस्कर्ते आहोत' हे लक्षवेधी विधान त्यांनी केलं होतं.