मुंबई : राजधानी दिल्लीत गोकुळपुरी परिसरात शुक्रवार रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत ७ लोकांचा मृत्यू झाला. आग लागल्याची माहिती मिळताच १३ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्व दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, 'रात्री 1 वाजता गोकुळपुरी पोलीस स्टेशन परिसरात आग लागली. सर्व बचाव उपकरणांसह पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन दलाशी देखील संपर्क साधला ज्याने खूप चांगला प्रतिसाद दिला. दुपारी चारच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. या अपघातात ३० झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या असून ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.