शहरातील खासगी रुग्णालयाला आग, नक्की कारण काय?
आगीमुळे रुग्णालयातील ऑपरेशन थेटर जळून खाक झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
नवी दिल्ली : शहरातील पटपरगंज येथील जैन रुग्णालयात अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीमुळे रुग्णालयातील ऑपरेशन थेटर जळून खाक झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (fire broke out on 2nd floor of jain hospital in pushpanjali enclave patparganj)
दुसऱ्या मजल्यावरील ओटीच्या (Opration Thetre) एसीला आग लागल्याने हा प्रकार घडल्याचं पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर शिफ्टिंगचे काम सुरू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
पुष्पांजली एन्क्लेव्ह पटपरगंज येथील जैन रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी 4.45 वाजता आग लागली, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अतुल गर्ग यांनी दिली.
जैन रुग्णालयात आयव्हीएफ केंद्र चालवलं जातं. दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण केली. तसेच काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली.
तपासादरम्यान रुग्णालया समोरील दुसऱ्या इमारतीत शिफ्ट काम सुरू असल्याचं पोलिसांना समजलं. सुदैवाने अपघाताच्या वेळी इमारतीत कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.