जम्मू : काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया सुरूच आहेत... कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. लोलाब व्हॅलीमध्ये गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी ठार झाले. 


दुसरीकडे, अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी चक्क बँकेच्या सुरक्षा रक्षकाची रायफल हिसकावून पळ काढला... जम्मू आणि काश्मीर बँकेच्या ब्राकपोरा शाखेत हा प्रकार झाला. बँकेतून रोख रक्कम लुटली गेल्याचं वृत्त नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.