महिला दिन विशेष : फ्लाईंग ऑफीसर अवनी चतुर्वेदीशी खास गप्पा
भारतीय वायूसेनेच्या फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदींनी नुकताच एक इतिहास रचला.
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदींनी नुकताच एक इतिहास रचला.
चतुर्वेंदी या जगातील सर्वात वेगवान लढाऊ विमान असणाऱ्या मिग २१ बाइसनमध्ये एकट्यानं भरारी घेणाऱ्या पहिल्या फायटर पायलट बनल्या. स्वातंत्र्यानंतर तब्बल सात दशकांनी भारताला पहिली महिला फायटर पायलट मिळाली.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेंदींनी त्यांच्या आतपर्यंतच्या उत्तुंग भरारीविषयी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदेंशी खास बातचीत केलीय...