भाजपची गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
गुजरात विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये चांगलीच धावपळ बघायला मिळत आहे.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये चांगलीच धावपळ बघायला मिळत आहे.
शुक्रवारी सत्ताधारी पक्ष भाजपने ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीये. गुजरातचे सध्या मुख्यमंत्री विजय रूपानी राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या या यादीत जास्तीत जास्त जुन्या नेत्यांची नावे दिसून येत आहेत. सोबत पटेल समुदायातील १३ उमेदवारांनाही तिकीट दिलं आहे.
भाजपने ७० उमेदवारांची यादी जाहीर केली असून या कोण कुठून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होत आहे. विजय रूपाने हे राजकोट पश्चिम, नितीन पटेल मेहसाणा आणि जितूभाई वाघाणी भावनगर पश्चिममधून भाजपचे उमेदवार बनले आहेत. या यादीत कॉंग्रेस सोडून आलेल्या पाच उमेदवारांचीही नावे आहेत.
गुजरातमध्ये १८२ जागांसाठी ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. भाजपची सत्ता असलेल्या या राज्यात कॉंग्रेस चांगलीच आक्रामक दिसत असून त्यामुळे भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यावेळी गुजरातची निवडणूक चांगलीच रोमांचक होणार आहे.