आशिया खंडातील पहिला साखर कारखाना ते उड्डाणपूल? विखे पाटलांचं योगदान
अहमदनगरसाठी विखे-पाटील घराण्याचं सर्वात मोठं योगदान.
पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : भारतात नेहमी चर्चेत राहणार शहर म्हणजे अहमदनगर (Ahmednagar). अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमुळे नगर शहराची नेहमीच जोरदार चर्चा (Ahmednagar Strong discussion)असते. अशा नेहमीच चर्चेत राहणार शहर यावेळी मात्र उड्डाणपुलामुळे (FLyover) चर्चेत आलंय. देशातील सर्वात वेगाने तयार झालेल्या उड्डाणपूलमध्ये अहमदनगरच्या पुलाचं नाव घेतलं जाणार आहे. या उड्डाणपुलावरुन नगर शहरातील ग्रीन सिटीचा (Ahmednagar Green City) अनुभव देखील घेता येणार आहे.
आशिया खंडातील पहिला कारखाना
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची (Asia's first sugar factory) 31 डिसेंबर 1950 या दिवशी स्थापना झाली. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील (Vitthalrao Vikhe Patil) यांचे कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांना सुखासमाधानाने (Happy farmers) आपले जीवन जगता यावे. त्यांच्या मालाला बाजारभाव प्राप्त व्हावे, शेतक-यांचे हालअपेष्टा थांबावेत, त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता यावे या उद्देशाने त्यांनी हा कारखाना (Sugar factory) सुरु केला. त्यामुळेच आजूबाजूच्या खेड्यातील आणि गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यामुळे शक्य झालं.
उड्डाणपुलासाठी सुजय विखेंचं मोठं यश
आशिया खंडातील पहिला कारखाना विठ्ठलराव विखेंनी काढल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न खासदार सुजय विखेंनी (MP Sujay Vikhe) यांनी सोडवला. त्यांनी उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवून आपल्या आजोबांच्या पाऊलावर पाऊल ठेवत विकासाच्या बाबतीत नगरकराचं स्वप्न पूर्ण (A citizen's dream fulfilled) केलंय. नगरमधील बड्या नेत्यांना जे जमलं नाही ते विखेंनी करुन दाखवलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) आणि आमदार अनिल राठोडाचं (Anil Rathod) निधन झाल्यानंतर खासदार होताच सुजय विखेंनी उड्डाणपुलासाठी दिल्लीत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींची (Union Roads Minister Nitin Gadkari) भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. उड्डाणपूल उभारण्यासाठी सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे लष्कराची जागा मिळवणे. परंतु वांरवार पाठपुरावा करुन सर्व संकटांवर मात करुन खासदार विखेंनी ती अडचण दूर करुन घेतली आणि नगरकरांची कोंडी फोडण्याचं काम केलं. या उड्डाणपुलाचा फायदा नगरकरांसोबत पुणे, संभाजीनगर, बीड, शिर्डीकडे (Pune, Sambhajinagar, Beed, Shirdi) जाणा-या वाहन चालकांना सर्वाधिक होणार आहे.
नगरकरांचं स्वप्न पूर्ण
उड्डाणपुलाच्या माध्यमातून नगरकरांचं स्वप्न 20 नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे. या उड्डापुलाच्या माध्यामातून नगर जिल्ह्याच्या सौंदर्यकारणात भर पडली आहे. उड्डाणपुलाच्या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात (city glory) भर पडली असल्याने नगर जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Roads Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते 19 नोव्हेंबरला उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
पहिल्या उड्डाणपुलाचं वैशिष्ट्ये
नगरकरांचे स्वप्न असलेला कमी कालावधीत वेगाने तयार झालेला उड्डाणपूल अवघ्या 22 महिन्यांत (FLyover 22 monthe) पूर्ण करण्यात आलं. हा पूल 3 किलोमीटरचा असून सक्कर चौक ते स्टेट बॅँक चौक (Sakkar Chowk to State Bank Chowk) पर्यतचा आहे. या पुलाची रुंदी ही 19 मीटर आहे. या उड्डाणपुलाचं काम 258 कोटींना करण्यात आलंय.
दिलीप गांधी, अनिल राठोड यांचं योगदान
अहमदनगर जिल्ह्यातील हा पहिला उड्डाणपूल होण्यासाठी अनेक वर्षे नगरवासियांना वाट पाहवी लागली. उड्डाणपूल होण्यासाठी माजी खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांनी खूप प्रयत्न केले होते. त्याचबरोबर लोकप्रिय शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड (Anil Rathod) यांनी देखील उड्डाणपुलासाठी अनेक वेळा आंदोलन, उपोषन केली. मुंबईत अनेक मंत्र्यांबरोबर बैठका तसेच पत्र देऊन देखील उड्डाणपूल होण्यासाठी प्रयत्न केले. अनिल राठोडांची इच्छा होती की शहरात एक नव्हे तर तब्बल तीन उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे दिलीप गांधी(Dilip Gandhi) आणि अनिल राठोड (Anil Rathod) यांचं योगदान विसरुन चालणार नाही.
अहमदनगर स्थापना
देशात आणि भारतात चर्चेत राहणा-या या शहराचा इतिहास (History of the Ahmednagar city)पाहिला तर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी झाली. अहमदनगर शहराच्या स्थापनेची मुहूर्तमेढ नगर शहराचे संस्थापक मलिक अहमद निजामशहा (Malik Ahmad Nizamshah) यांनी रोवली. आज शहराला 532 वर्ष पूर्ण झालीये. शहराच्या इतिहासाची पाने वाचली तर नगर हे काय आहे. हे संपूर्ण इतिहास सांगून जातो. त्यामुळेच की काय या शहराची चर्चा नेहमीत असते.