नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच वायु सेनेच्या महिला पायलट अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह एकट्याच सुपरसॉनिक फायटर जेट उडवणार आहेत. या तिन्ही महिलांनी आपलं नाव इतिहासात कोरलं आहे.


सर्वात कठीण विमान उडवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिन्ही भारतीय वायु सेनेचं लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत. यांनी एयरफोर्सचं कठीण प्रशिक्षण ट्रेनिंग पूर्ण केली आहे. या तिन्ही पायलट मिग-21 बाइसन्स जेट उडवणार आहेत.


३४० किमी वेगाने लँडिंग


मिग-21 बाइसन्स या विमानाचं टेक-आफ आणि लँडिंग स्पीड सर्वाधिक असतं. 340 किमी प्रति तास त्याचा वेग असतो. या तिन्ही एअरबेस वरुन विमानाचं उड्डाण करणार आहेत. 


पहिल्यांच होणार असं


आतापर्यंत या तिन्ही महिला पायलटांनी सोलो सोर्टिज सारख्या पायलट्स पीसी-7, किरन आणि हॉक जेट या सारखी विमानं उडवली आहेत. अशा विमानांचं उड्डाण करणं खूप सोपं समजलं जातं. पण आता अवनी आणि भावना मिग-21 सारखे युद्ध विमान उडवण्यासाठी या महिला पायलट सज्ज झाल्या आहेत.