काँग्रेसच्या पाच आमदारांचा एनपीपीमध्ये प्रवेश
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आता मेघालयात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आता मेघालयात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
मेघालयमधील काँग्रेसच्या पाच आमदार हे भाजपचा सहयोगी पक्ष नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी)मध्ये सहभागी झाले आहेत.
मेघालय विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत या आमदारांनी शिलाँग येथील एनपीपी रॅलीत एनपीपी पक्षात सहभागी झाले.
एनपीपीचे प्रवक्त जेम्स के संगमा यांनी या रॅलीत घोषणा केली की, त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे १० सदस्यांनीही पक्षात सहभाग घेतला.
एनपीपीचं नेतृत्व माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगमा यांचा मुलगा कॉनराड के संगमा करत आहे. सत्तारुढ काँग्रेसच्या पाच आमदारांसोबत इतरही आठ आमदारांनी गेल्या २९ डिसेंबर रोजी मेघालय विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिली होती. त्यावेळी आपण लवकरच एनपीपीमध्ये सहभागी होणार असल्याचंही जाहीर केलं होतं.
एनपीपीमध्ये सहभागी झालेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री रोवेल लिंग्दोह, सनिआवभालंग धर, कमिनगोन यंबोन, प्रोस्टोन तेनसोंग आणि न्गैतलांग धर तसेच युनायटेड डेमोक्रेटिक पक्षाचे रेमिंगटन पिनग्रोप, अपक्ष स्टीफेंसन मुखिम आणि होफुल बामन यांचा समावेश आहे.
विधानसभेची मुदत सहा मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे यापूर्वीच मेघालय विधानसभेची निवडणूक होणार आहे. मेघालयसह नागालँड आणि त्रिपुरामध्येही निवडणुका होतील.