नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. मानससोरवर पार्क परिसरात जिंदाल कुटुंबातील चार महिलांचा खून झाल्याचं उघड झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चौघींसह त्यांच्या सुरक्षारक्षकालाही मारण्यात आलंय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 


सर्वांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आलेत. ज्या महिलांची हत्या झाली त्यात ८२ वर्षीय उर्मिला जिंदाल आणि त्यांच्या तीन मुली संगीता गुप्ता(४८), नुपूर जिंदाल(४८) आणि अंदली जिंदाल(३८) यांचा समावेश आहे. या महिलांची हत्या चाकूच्या सहाय्याने करण्यात आली. गार्ड राकेश यांचा मृतदेह ग्राऊंड फ्लोरला आढळला.