मुंबई : अनेक लोकांना मद्य सेवनाची सवय असते. देशभरात असंख्य लोक मद्य सेवन करतात. एका रिपोर्टनुसार देशात जवळपास 16 कोटी लोक मद्य सेवन करतात.  ज्यामध्ये 95 टक्के पुरुषांचा समावेश आहे. ज्यांचं वय 18 ते 49 वर्षांदरम्यान आहे. देशात प्रत्येक वर्षी जवळपास हजारो लीटर मद्याची विक्री होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वे कंपनी क्रिसिलने जारी केलेल्या रिपोर्टनुसार 2020 साली, 5 राज्यांनी देशात विकल्या गेलेल्या एकूण मद्यापैकी सुमारे 45 टक्के मद्याचं सेवन केलं आहे. देशातील 5 राज्य ज्याठिकाणी सर्वाधिक मद्याचं सेवन होतं. 


छत्तीसगड
देशात ज्याठिकाणी सर्वाधिक मद्य विक्री छत्तीसगडमध्ये होते. जवळपास 3 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात 35.6 टक्के लोक मद्य सेवन करतात. 


त्रिपुरा
या यादीत त्रिपुरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्रिपुरामध्ये 34.7 टक्के लोक मद्य सेवन करतात. ज्यामध्ये 13.7 टक्के लोक नियमित मद्य सेवन करतात.


आंध्र प्रदेश 
या यादीत आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशात जवळपास 34.5 टक्के लोक नियमित मद्य सेवन करतात.


पंजाब
या यादीत पंजाब चौथ्या स्थानी आहे. जवळपास 3 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात 28.5 टक्के लोक मद्य सेवन करतात. पंजाबमध्ये जवळपास 6 टक्के लोक नियमित मद्य सेवन करतात.


अरुणाचल
या यादीत अरुणाचल 5 व्या स्थानी आहे. याठिकाणी 28 टक्के लोक मद्य सेवन करतात.