नवी दिल्ली : आईचं प्रेम बाळासाठी किती असू शकतं याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. पण जेव्हा कधी दुसरी महिला एखाद्या बाळाला स्वत:दूध पाजत असेल तर तिच्या बद्दलचा सन्मान अधिकच वाढतो. फिलिपीन्सची एअरहोस्टेस सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे. पत्रिशा ही फिलिपीन्स एअरलाईन्समध्ये एअरहोस्टेस म्हणून काम करतेय. 6 नोव्हेंबरला पत्रिशाला एका वेगळ्याच घटनेला सामोर जाव लागलं.


'माझं दूध पाजू का ?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानाने टेक ऑफ केलं होतं. अचानक एक नवजात बालक रडू लागलं. त्याच्या आईने बाळाला शांत करण्याचा हरएक प्रयत्न केला पण ते काही शांत होत नव्हतं. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून पत्रिशा तिथे पोहोचली. बाळाचं बॉटलमधील दूध संपल्याचं तिच्या आईने पत्रिशाला सांगितलं.


यावेळी स्वत: ब्रेस्ट फिडींग करण्याची ऑफर पत्रिशाने दिली. त्या आईकडे देखील याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.


यामुळे बाळाचं पोट भरणार होतं. पत्रिशाने बाळाला स्वत:चं दूध पाजण्यास सुरूवात केली आणि बाळ शांत झालं. ही घटना पाहणाऱ्या सर्वांच मन आदराने भरून आलं.


पत्रिशाला प्रमोशन 


या सर्व घटनेवर पत्रिशा म्हणते, 'मी एक आई असल्याने या घटनेचं गांभीर्य चांगल्या रितीने समजू शकते.


बाळाचं भुकेने व्याकूळ होणं एका आईसाठी त्रासदायक असतं. फिलिपीन्सने या घटनेनंतर पत्रिशाला तात्काळ प्रमोशन दिलंय. 


पत्रिशाचं कौतूक 


फेसबुकवर शेअर झालेल्या या पोस्टला काही वेळातच 1.44 लोकांनी लाईक जगभरात पत्रिशाचा हा फोटो व्हायरल होतोयं.


प्रत्येकजण तिचं तोंडभरून कौतूक करतोयं. केलंय. यावर 6 हजार 300 हून अधिक कमेंट्स तर 29 हजार 500 हून अधिक जणांनी हे शेअर देखील केलंय.