Flipkart Big Billion Days 2023: सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अनेक कंपन्या मोठ मोठ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यात आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2023 सज्ज झाला आहे. या सेलमध्ये सर्व ब्रँडच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. तसेच बँक कार्ड वापरल्यास किंवा ईएमआयमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला मोठ्या सवलती मिळू शकतात. आयफोनपासून लॅपटॉपपर्यंत सर्व वस्तू येथे अत्यंत कमी किंमतीत मिळणार आहेत.फ्लिपकार्टने 2023 मध्ये आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) सेलची झलक देण्यासाठी एक विशेष लँडिंग वेबपेज तयार करण्यात आले आहे. या वेबपेजवर ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ग्राहकांनी आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्क्यांपर्यंत त्वरित सूट मिळू शकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच पेटीएम, यूपीआय वापरून केलेल्या व्यवहारांवर हमी बचत देखील देत आहे. म्हणजेच तुम्हाला आवडलेली वस्तू घ्यायची आहे पण त्याचे पैसे नंतर द्यायचे असतील तर फ्लिपकार्टची पे लेटर सुविधा वापरू शकता. याशिवाय जुन्या वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी, मोफत मासिक हप्ते आणि सवलत यांसारखे पर्यायही असतील.


फ्लिपकार्टकडून ही सर्वात मोठी ऑफर विक्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत गुप्त ठेवण्याची योजना आखत आहे. ते 1 ऑक्टोबरला iPhones साठी, 3 ऑक्टोबरला Samsung स्मार्टफोन, 7 ऑक्टोबरला Xiaomi स्मार्टफोन आणि 5 ऑक्टोबरला Pixel हँडसेटच्या डील समोर येणार आहेत.  त्यामुळे ग्राहकांना आकर्षक सवलतींबद्दल अधिकृत माहिती मिळण्यासाठी या तारखांची वाट पाहावी लागणार आहे. 


आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान, तुम्ही अॅपल, सॅमसंग, गुगल, रियलमी, ओपो, शाओमी, नथिंग आणि विवो सारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या विविध स्मार्टफोन्सवर मोठी सवलत मिळू शकते. एवढेच नव्हे तर काही स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट असेल मिळणार आहे.  यामध्ये मोटो जी 54 5G, सॅमसंग गॅलेक्सी F34 5G, रिअलमी C51, रिअलमी 115G, रिअलमी 11x 5G, इन्फिनिक्स झिरो 30 5G, मोटो G84 5G, Vivo V29e आणि पोको M6 प्रो 5G यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टने याबद्दल माहिती दिली आहे.