Flood Viral Video : यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे दिल्लीत (#delhiflood) पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार निसर्गाने आपलं रौद्ररुप दाखवलं आहे. कुठे रस्ते वाहून गेले तर कुठे पूल नदीत कोसळला, असंख्य गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. बघ्याव तिकडे निर्सगाचा कोप पाहिला मिळत आहेत. अशातच जीव वाचवत सर्वसामान्य लोक एकमेकांना आधार देत आहे. अशातच पुरातील पाण्यात माणुसकीचं दर्शन झालं. (Flood Video 2 man save street dogs in flood viral video on Internet Trending on google news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात पाऊस आमि पुराचा कहरामुळे विदारक दृश्यंना आपण अवस्थ झालो आहेत. अशातच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे. दोन तरुणांनी पुरातून कुत्र्यांना वाचवण्यासाठी आपल्या जीव धोक्यात घातला. पुरामुळे माणसांसह मुक्या प्राण्यांनाही फटका बसला आहे. 



वाऱ्यासारखा पसरलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्यावरुन तुफान वेगाने पाणी वाहत आहेत. तेवढ्यात या पाण्यातून दोन कुत्रे वाहत जाताना त्या दोघांच्या नजरेस पडलं. त्यानंतर त्या दोघांनी पुढच्या मागच्या कसलाही विचार न करता पाण्यात धावत जावून त्या दोन मुक्या प्राण्यांचा जीव वाचविला. जीवाची पर्वा न करता त्यांनी माणुसकीचं दर्शन दिलं. 


अनेक जण कुत्र्यांला आपल्या जीवाप्रमाणे कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्याचा सांभाळ करतात. ही पाळीव कुत्री माणसावर जीव लावतात. आपल्या मालकासाठी जीव धोक्यात घालतात. पण या उलट रस्त्यावरील भटके कुत्र्यांपासून माणसाला धोका असतो. ते अनेक वेळा माणसांवर हल्ले करतात आणि त्यांची लचके तोडतात. 



पण सोशल मीडियावरील हा व्हिडीओ खरंच माणुसकीचं दर्शन घडविणारा आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील व्हायरल भयानी या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तरुणांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.