घराबाहेर तिरंगा फडकावून भाजपचा विरोध करा; ओवेसींचे जनतेला आवाहन
ही लढाई केवळ मुस्लिमांपुरती मर्यादित नाही.
हैदराबाद: राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NCR) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (CAA) विरोध करण्यासाठी लोकांनी आपापल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा, असे आवाहन एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केले. ते शनिवारी हैदराबाद येथील सभेत बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी म्हटले की, ज्यांचा राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NCR) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आहे त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवा. जेणेकरून हे कायदे चुकीचे असल्याचा संदेश भाजपपर्यंत पोहोचेल, असे ओवेसी यांनी म्हटले.
माझा जन्म पाकिस्तानात झालाय, मी पुरावा कुठून आणायचा- मणीशंकर अय्यर
यावेळी ओवेसींच्या सभेला आलेल्या लोकांकडून संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले. तर ओवेसी यांनीही शांतता आणि अहिसेंच्या मार्गाने निदर्शने करावीत, असे आवाहन लोकांना केले. ही लढाई केवळ मुस्लिमांपुरती मर्यादित नाही तर त्यामध्ये दलित आणि अनुसूचित जाती-जमातींचाही समावेश आहे. तुम्ही मला गद्दार कसे म्हणू शकता? मी इच्छेने आणि जन्माने भारतीय असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.
#CAA ची अंमलबजावणी सुरु; तीन पाकिस्तानी तरुणांना भारतीय नागरिकत्व
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.