SIM Card Fraud: आपल्या आयुष्यात SIM कार्ड, मोबाईल अशा सुविधांनी एक वेगळीच सुधारणा आणली. या सुविधांमुळे आपल्याला आपली अनेक कामे सहजपणे आता करता येत आहेत. दैनंदिन जीवनात SIM कार्डने नातेवाईकांचे, मित्रांचे नंबर save करण्याचे साधन उपलब्ध करून दिले आहे. या SIM कार्डचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांपासून पळून जाण्यासाठी गुन्हेगार अनेकदा बनावट SIM चा आधार घेतात आणि गुन्हे करतात. तूमचा SIM कार्ड हा कुठल्याही गुन्हेगाराच्या हातात जाऊ शकतो आणि त्याचा वापर तो गुन्हेगारीसाठीही करू शकतो. झारखंड पोलिसांनी अशाच एका प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात निरपराध गावकऱ्यांच्या नावाने SIM कार्ड तयार करून ते कार्ड असाच एक इसम गुन्हेगारांच्या ताब्यात देत होता. 


झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल SIM बाबत फसवणूक करणारे लोक गावागावात जाऊन त्यांच्या आधार कार्डच्या आधाराने गावकऱ्यांचा तपशील घेऊन त्यांच्याकडून SIM खरेदी करायचे. मग पैसे घेऊन हे SIM गुन्हेगारांना विकले जायचे. 


SIM खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा नवीन SIM साठी तुम्ही दुकानदार किंवा स्टोअर ऑपरेटरला कोणतेही document द्याल तर त्याच्याखाली objective लिहा आणि त्यावर signature करा. उदाहरणार्थ जर document SIM खरेदी करण्याबाबत असेल तर तसं लिहून तुमची सही करा. नेहमी अनपॅक केलेले SIM कार्ड खरेदी करा आणि प्री-अॅक्टिव्हेटेड SIM खरेदी करणे टाळा. कस्टमर केअरने तुमच्या SIM ची पडताळणी केली आहे की नाही खात्री करा. 


TRAI चा नियम काय म्हणतो?
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या नियमांनुसार स्वतःसाठी एक व्यक्ती जास्तीत जास्त 9 SIM खरेदी करू शकते. 
- पडताळणीशिवाय म्हणजेच varification केले नाहीत तर तुमच्यावर नावावर असलेले SIM त्वरित बंद केले जाईल.
- जर एका व्यक्तीच्या नावावर 9 पेक्षा जास्त SIM असतील तर आउटगोइंग कॉल 30 दिवसात आणि इनकमिंग कॉल 45 दिवसात बंद केले जातील तर संपुर्ण SIM 60 दिवसात निष्क्रिय केले जाईल. 


तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासायचे?
- सर्वप्रथम DOT tafcop.dgtelecom.gov.in या अधिकृत साइटवर जा.
- होम स्क्रीनवर तुमचा मोबाइल नंबर एंटर करा.
- मोबाईलवर मिळालेला OTP टाका आणि Validated वर क्लिक करा.
- तुमच्या आधार कार्डमधून घेतलेल्या सर्व सिमचे क्रमांक स्क्रीनवर दिसतील.