मुंबई : ऑनलाइन बँकिंग सुविधेमुळे बँक ग्राहकांसाठी व्यवहार अतिशय सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग व्यवहार वाढण्यासोबतच ऑनलाइन व्यवहारात फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. ऑनलाइन बँक फसवणुकीच्या घटना दररोज समोर येत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी, बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल सतर्क करत असतात. युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे 10 ऑनलाइन बँकिंग व्यवहाराविषयी सुरक्षा टिपा दिल्या आहेत.


संशयास्पद पॉपअपपासून सावध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांनी संशयास्पद पॉप अपपासून सावध रहावे. कारण त्यामुळे तुम्ही मालवेअरला बळी पडू शकता.


सुरक्षित पेमेंट गेटवे तपासा


ऑनलाइन व्यवहारांसाठी नेहमी सुरक्षित पेमेंट गेटवे वापरा. ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी, सुरक्षित पेमेंट गेटवे (URL आणि https://- पॅड लॉक चिन्ह) सत्यापित करा.


ई-मेल संदेशाद्वारे वेबसाइटला भेट द्या


वेबसाइटला भेट देण्यासाठी ई-मेल संदेशातील लिंकवर कधीही क्लिक करू नका. ई-मेलमधील लिंक व्हायरस किंवा मालवेअर हल्ल्यांना असुरक्षित असू शकतात.


फक्त URL टाइप करून बँकेच्या वेबसाइटला भेट द्या


ग्राहकांनी नेहमी त्यांच्या अॅड्रेस बारमध्ये फक्त URL टाइप करून त्यांच्या बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन केले पाहिजे.


पासवर्डमध्ये विशिष्ट सांकेतिक अक्षरे/अंक/सिम्बॉल वापरा


पासवर्ड सेट करताना लहान अक्षरे, मोठी अक्षरे, अंक, विशिष्ट सिम्बॉल या सर्वांचे मिश्रण असावे. उदा. iLIke3Red@cOLor


पिन, कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक गोपनीय ठेवा


ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक ओळख क्रमांक (PIN), पासवर्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, CVV क्रमांक आणि इतर सर्व वैयक्तिक डेटा गोपनीय ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हे इतर कोणाशीही शेअर करू नका.