मुंबई : राज्यासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांकडून हळू हळू विविध निर्बंधांवर भर घालण्यात येत आहेत. नागरिकांना प्रवासादरम्यान संसर्ग होऊ नये म्हणून, विमान प्रवासासाठीही DGCA क़़डून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आल्या आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


  • -विमान प्रवासादरम्यान मास्क न लावल्यास होणार कारवाई

  • -मास्क नसेल तर विमानतळावर प्रवेश नाही

  • -नियम मोडणा-यांचा विमान प्रवास बॅन होऊ शकतो


 विमान प्रवासादरम्यान जर मास्क लावला नसेल तर प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. डीजीसीएकडून नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार मास्क नसेल तर विमानतळावर प्रवेश मिळणार नाही. त्याचसोबत विमान तळावर मास्क योग्य रितिने लावलं नसेल तर प्रवास नाकारला जाऊ शकतो. आणि विमानात मास्क लावला नसेल तर प्रवाशांचं नाव काळ्या यादीत टाकलं जाईल.