Lunar Eclipse 2022: चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, शास्त्रज्ञांनी पाहा काय सांगितले...
Food During lunar Eclipse: आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संध्याकाळी 5:20 पासून पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण 6.20 वाजता संपेल. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का। तसेच अन्न खाऊ शकतो का? ग्रहणात अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्याची हानी होईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या?
Lunar Eclipse Time: आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. ( Chandra grahan 2022 News) ग्रहण हे सूतक म्हणून ओळखलं जाते. अशा परिस्थितीत अनेक लोकांसाठी सूतकच्यावेळी जेवण बनविले जात नाही. किंवा अन्न खाल्ले जात नाही. तसा लोकांचा समज आहे. चंद्र ग्रहण आज संध्याकाळी 5.20 वाजून 20 मिनिटांनी दिसेल आणि 6.20 वाजता संपेल. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, चंद्रग्रहणादरम्यान असे अनेक किरण बाहेर पडतात जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. हे खरंच घडतं का? याबद्दल शास्त्रज्ञ काय सांगतात, ते जाणून घ्या.
या विषयावर विज्ञानाचे मत काय आहे? ग्रहणादरम्यान ( Lunar Eclipse 2022) काहीही खाणे शरीरासाठी हानिकारक असू शकते का?
मंगळवारी ही कामं चुकीनही करु नका, अन्यथा हनुमानजी होतील नाराज
नासाने सांगितली बाब...
लोकांचा असा विश्वास आहे की, ग्रहणाच्या वेळी उत्सर्जित होणार्या रेडिएशनचा तुमच्या स्वयंपाकघरातील अन्नावर परिणाम होतो. जे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि यावेळी अन्न खाणारी व्यक्ती आजारी देखील पडू शकते. या विषयावर शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, या गोष्टी निराधार आहेत. त्यात तथ्य नाही. चंद्रग्रहण 2022 दरम्यान उत्सर्जित झालेल्या हानिकारक किरणांचा अन्नावर परिणाम झाला तर ते तुमच्या स्वयंपाकघरातील अन्न किंवा शेतातील पिकांचेही नुकसान करू शकतात.
ग्रहणातील किरण तुम्हाला आंधळे करतील का?
नासाच्या शास्त्रज्ञांनी हे सत्य नसल्याचे सांगितले आहे. चंद्रग्रहण 2022 दरम्यान, जेव्हा पृथ्वी आणि सूर्य चंद्राच्यामध्ये येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, सूर्यग्रहण पाहिल्याने नुकसान होते. कोणत्याही उपकरणाशिवाय चंद्रग्रहण पाहता येईल का? जाणून घ्या नासाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले?
चंद्रग्रहण कसे पहावे? ( Chandra grahan 2022 News)
चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याचे नासाने सांगितले आहे. ते पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही, तथापि, आपण दुर्बिणीने चांगले पाहू शकाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे ग्रहण दुर्बिणीने पहायचे असेल तर त्याचा सेटअप गडद ठिकाणी ठेवा.