नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला बंडखोर सूर दाखवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात आपण आपला उमेदवार उभे करणार असल्याचे कॅप्टन यांनी जाहीर केलेय. ते म्हणाले की, 'सिद्धू यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनू दिले जाणार नाही कारण ते देशासाठी मोठा धोका आहेत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सिद्धू केवळ पंजाबच नाही तर संपूर्ण देशासाठी धोका आहे. त्यांनी खुलासा केला की, त्यांना तीन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडायची होती, पण त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तसे करण्यास नकार दिला होता. चरणजीत सिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिद्धूच्या हस्तक्षेपाचा कॅप्टन यांनी टीका करत म्हटलं की, ते आता सुपर सीएम झाले आहेत. यासोबतच त्यांनी केसी वेणुगोपाल, अजय माकन आणि सुरजेवाला यांनाही लक्ष्य केले आहे.


अमरिंदर सिंग यांनी सिद्धूच नव्हे तर पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, चन्नी यांना गृह विभाग हाताळण्याचा अनुभव नाही, जो पंजाब शेजारच्या पाकिस्तानसोबत 600 किलोमीटरची सीमा सामावून घेत असल्याने अत्यंत चिंताजनक आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती गंभीर होत आहे.


त्याचवेळी त्यांनी सिद्धू याचे एक नाटककार म्हणून वर्णन केले आणि सांगितले की राहुल-प्रियांका अजून अनुभवी नाहीत आणि त्यांची सल्लागारांकडून दिशाभूल केली जात आहे.


आपली ताकद व्यक्त करताना कॅप्टन म्हणाले की, मी एक सैनिक आहे आणि मला कसे काम करावे हे माहित आहे. ते म्हणाले की ते सात वेळा विधानसभेत आणि दोन वेळा संसदेत पोहोचलो आहे. हायकमांडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अमरिंदर म्हणाले की, आपल्या धर्मात प्रत्येकाला समान डोळ्यांनी पाहिले जाते आणि एखाद्याने त्याची जात पाहून न्याय करू नये, तर त्याची क्षमता बघितली पाहिजे. त्यांचा इशारा पंजाबचे पहिले मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांच्याकडे होता.