BS Yediyurappa : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकांचा (karnataka assembly election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे कर्नाटकात सगळीकडे निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. दुसरीकडे कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) हे नाव चर्चेत आले आहे. येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र तरीही भाजपच्या (BJP) येडियुरप्पा प्रचारात सर्वात पुढे आहे. मात्र याच प्रचारादरम्यान येडियुरप्पा हे एका जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याच्या विविध भागांचा दौरा करणारे येडियुरप्पा सोमवारी मोठ्या अपघातातून बचावले आहेत. प्रचारासाठी येडियुरप्पा कलबुर्गी जिल्ह्यातील जेवेरगी भागात हेलिकॉप्टरने (helicopter accident) आले होते. मात्र त्यावेळी हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे आजूबाजूच्या झोपड्यांवरचे प्लास्टिक आणि त्याभोवती असलेला कचऱ्याचा ढीग हवेत उडू लागला. त्यामुळे हवेतच हेलिकॉप्टर काही वेळासाठी खाली झुकले.



तितक्यात हेलिकॉप्टरच्या पायलटने समजूतदारपणा दाखवला आणि ते पुन्हा हवेत उडवले. पायलटने पुन्हा हेलिकॉप्टर वर नेले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. परिस्थिती लक्षात घेऊन पायलटने समजूतदारपणा दाखवत हेलिकॉप्टर वर नेले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलीस दलाने परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर हेलिकॉप्टर उतरवता आले.