अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात माजी मंत्र्यांसह तिघांना जन्मठेप
तिघेही सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी आढळले.
नवी दिल्ली : चित्रकूट अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणात गायत्री प्रसाद प्रजापतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गायत्री प्रजापती याला गुरुवारी दोषी ठरवण्यात आले. माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती याच्यासह तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. (gayatri prasad prajapati life impression in chitrakoot minor gang rape case)
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री प्रसाद प्रजापती, अशोक तिवारी आणि आशिष शुक्ला यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे तिघेही सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी आढळले. या प्रकरणात विकास वर्मा, अमरेंद्र सिंग उर्फ पिंटू, चंद्रपाल, रुपेश्वर उर्फ रुपेश यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
गायत्री प्रजापतीवर काय आरोप होते?
गायत्री प्रसाद प्रजापती हा समाजवादी सरकारमध्ये खाण मंत्री राहिला आहे. गायत्री प्रसाद प्रजापती आणि इतर सहा जणांवर चित्रकूटच्या एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या महिलेने सांगितले की, ती मंत्री गायत्री प्रजापती यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर मंत्री आणि त्याच्या साथीदारांनी तिला नशेत ढकलून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. तक्रारीनंतर गायत्री प्रजापतीच्या वतीने कुटुंबीयांना धमकावल्याची बाबही समोर आली.
कुटुंबाला एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर गायत्री प्रजापतीविरुद्ध गौतमपल्लीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर गायत्री प्रजापती व इतर आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले.