नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेचं 11500 कोटींचं लोन घेऊन नीरव मोदी फरार झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी देखील या बँकेतून कर्ज घेतलं होतं. पंतप्रधान शास्त्री यांनी पीएनबीकडून ५००० रुपयांचं कार लोन घेतलं होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ललिता यांनी आपल्या पेंशन मधून ते फेडलं. ही माहिती त्यांचा मुलगा अनिल शास्त्री यांनी दिली आहे.


वरिष्ठ काँग्रेस नेता अनिल शास्त्री यांनी म्हटलं की, 'आम्ही सेंट कोलंबा शाळेत जायचो. कधी-कधी आम्ही ऑफिसच्या कारने जायचो. पण माझ्या वडिलांनी खासगी कामासाठी कधीच सरकारी कार नाही वापरली. त्यासाठी घरी एक मागणी होती की आपण खासगी कार खरेदी करावी.


वर्ष 1964 मध्ये नव्या फिएटची किंमत 12,000 रुपये होती. शास्त्री परिवाराकडे बँकेत फक्त 7,000 रुपये होते. पंतप्रधानांनी 5,000 रुपयांच्या लोनसाठी अर्ज केला. त्या दिवशीच तो मान्य झाला. 11 जानेवारी 1966 ला ताश्कंदमध्ये शास्त्रीचा मृत्यू झाला. पण लोन शास्त्रींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने फेडलं.


शास्त्री परिवाराद्वारा खरेदी केलेली कार क्रीम कलरची होती. ज्याचा मॉडल नंबर 1964 होता. DLE 6 असा य़ा गाडीचा नंबर होता. आता ही कार 1 मोतीलाल नेहरू मार्ग, लाल बहादुर शास्त्री मेमोरियलमध्ये प्रदर्शनात ठेवली आहे. पीएनबीची  स्थापना 1894 मध्ये झाली आणि ब्रिटिश काळात देशात एक विदेशी बँक असावी अशी यामागची कल्पना होती.