नवी दिल्ली : 'सुपरकॉप', खालिस्तानी दहशतवाद्यांचा कर्दनकाळ, अशी ओळख असलेले पंजाबचे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे आज दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिले गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यादोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. बऱ्याच काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वाढत्या वयामुळे उपचारांना त्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता.


पंजाबमधील खालिस्तानी चळवळीचा दहशतवाद मोडून काढण्यात केपीएस गिल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका होती. १९८८ ते १९९० दरम्यान पंजाब पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावल्यानंतर गिल यांची १९९१ मध्ये पुन्हा पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.  


२००० ते २००४ दरम्यान श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलमविरोधात (लिट्टे) कारवाईची व्यूहरचना करण्यातही गिल यांची मदत घेण्यात आली होती. छत्तीगडमधील नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी तेथील राज्य सरकारने २००६मध्ये गिल यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.  


दरम्यान, गिल भारतीय पोलीस सेवेतून १९९५ मध्ये निवृत्त झाले. उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना १९८९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इंडियन हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. गिल इंस्टीट्युट फॉर कॉन्फिक्ट मॅनेजमेंटचेही ते अध्यक्ष होते.