Raghuram Rajan on Banking Crisis: अमेरिकेतील दोन मोठ्या बॅंका बुडाल्या असून आता युरोपातील क्रेडिट सुइस बॅंकही (Credit suisse) बुडण्याच्या पार्श्वभुमीवर आहे. त्यामुळे सध्या जागतिक बॅंकांच्या व्यवस्थेमध्येही आर्थिक संकट पाहायला मिळते आहे. आता हेच संकट येत्या काळात वाढण्याची (Global Bank Crisis) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी बॅंकिंग क्षेत्रात मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे. हे संकट वाढू शकते आणि त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. (Former Rbi governer raghuram rajan on global banking crisis business news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील अर्थतज्ञ या परिस्थितीचा आढावा घेत आपापले विश्लेषण जगासमोर मांडताना दिसत आहेत. राजन यांनी यावेळी या बॅंकिंग क्रायसिसवर आपले मतं मांडले. या सगळ्या बॅंकाचा विचार करता जगाच्या बॅंकिंग प्रणालीवर मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. त्यामुळे ही व्यवस्था जगातील मोठ्या धोक्याकडे वळते आहे. सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) आणि क्रेडिट सुईस बँकेचे संकट हे पसरते आहे. त्यामुळे बॅंकांच्या चलनविषयक धोरणांना हाताळणं सोप्पं नसल्यानं त्याचा परिणाम बॅंकींग व्यवस्थेवर होतो आहे, असे मतंही त्यांनी मांडले. 


काय आहेत कारणं? 


सेंट्रल बॅंकनं दहा वर्षांपासून इझी मनी आणि तरलतेच्या सवयीमुळे मोठ्या संकटात अडकवून घेतले आहे. त्यामुळे या समस्येला तोंड देण्यासाठी तशी आर्थिक धोरणं आखली जात आहेत. ज्यामुळे आर्थिक व्यवस्थेतील संकटाचा धोका कमी होण्यास मदत होईल. 


रघूराम राजन यांचे याआधीचे आर्थिक मंदीबाबतचे भाकित 


रघुराम राजन यांनी 2005 साली बॅंकिंग क्षेत्रातील संकटाचे भाकित सांगितले होते तर 2008 सालीही IMF चे मुख्य अर्थतज्ञ असतानाही त्यांनी जागतिक मंदीचा अंदाज वर्तवला होता. यामागील काही कारणंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केली होती. रघुराम राजन हे 2013 ते 2016 च्या काळात आरबीआयचे गर्व्हनर होते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, रघुराम राजन म्हणाले, 'मला आणखी चांगल्या परिस्थितीची यापुढे अपेक्षा आहे, परंतु येत्या काही दिवसांत हे संकट आणखी गडद होऊ शकते. याचे कारण जर पुढे काही घडले ते कोणालाच माहिती नसेल. समस्या अशी आहे की सोपे पैसे आणि दीर्घ काळासाठी उच्च तरलता अशी रचना तयार झाल्यामुळे सध्या हे आर्थिक संकट ओढावले आहे.