Monsoon Session : महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यापासून ते अविश्वास प्रस्तावावरील (no confidence motion) तीन दिवस चाललेल्या चर्चेपासून ते तहकूब आणि निलंबनापर्यंत यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 दिवस चालले. मणिपूर प्रकरणावरुन (manipur violence) पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी भाष्य करावं यासाठी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली होता. चर्चेच्या पहिल्या दिवशी मणिपूरसह विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. तर विरोधकांना प्रत्युत्तर देताने सत्ताधाऱ्यांनी इंडिया (INDIA) आघाडीला लक्ष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत तीन विधेयकं सादर केली. त्यानंतर संसदेची दोन्ही सभागृहे शुक्रवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे या अधिवेशनातील 17 दिवसांतील चार दिवस म्हणजे तब्बल 94 तास वाया गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा चुराडा देखील झाला आहे.


20 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान चाललेल्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात लोकसभेच्या 17 बैठका झाल्या. मणिपूर हिंसाचार प्रकरण आणि दिल्ली सेवा विधेयकाच्या निषेधार्थ झालेल्या गदारोळात लोकसभेचे कामकाज केवळ 45 टक्के होऊ शकले. तर सर्व 20 तारांकित प्रश्नांची मौखिक उत्तरे 9 ऑगस्ट रोजी देण्यात आली.


राज्यसभेत 50 तर लोकसभेत 44 तास वाया


संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत आणि लोकसभेत एकूण 17 दिवस कामकाज झाले. राज्यसभेत गदारोळामुळे 50 तास आणि 21 मिनिटे वाया गेली. तर लोकसभेत 44 तास 13 मिनिटे वाय गेली.


कसं चालतं कामकाज?


आपण निवडून दिलेल्या नेत्यांनी संसदेत केलेला गोंधळ आणि गदारोळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.  संसदेतील नेत्यांच्या गदारोळामुळे देशात राहणाऱ्या करदात्यांचे दर तासाला पैसे बुडतात. संसदेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होते, जे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालते. दरम्यान, खासदारांना दुपारी 1 ते 2 या वेळेत जेवणाचा ब्रेकही मिळतो. शनिवार आणि रविवार वगळता संसदेचे कामकाज पाच दिवस चालते. अधिवेशनादरम्यान एखादा सण आला तर तो दिवस सुट्टीचा मानला जातो.


संसदेच्या कामकाजावर किती खर्च होतो?


संसदेच्या प्रत्येक कामकाजावर जवळपास प्रत्येक मिनिटाला 2.5 लाख रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. म्हणजे एका तासात दीड कोटी रुपये (दीड कोटी) खर्च होतात. संसदेच्या अधिवेशनाच्या 7 तासांमध्ये एक तासाचे जेवणाची वेळ काढून 6 तास वाचतात. या 6 तासांत दोन्ही सभागृहात निषेध, गोंधळ देखील होतो. त्यामुळे दर मिनिटाला अडीच लाख रुपयांची उधळपट्टी होत आहे. त्यामुळे संसदेतील गदारोळामुळे सर्वसामान्यांचे अडीच लाख रुपये दर मिनिटाला वाया जातात. हा पैसा खासदारांचा पगार, संसद सचिवालयावरील खर्च, संसद सचिवालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, अधिवेशन काळात खासदारांच्या सुविधांवर खर्च केला जातो.