जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ७ सैनिक मारले गेले आहेत. भारताने केलेल्या या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या कारवाईच पाकिस्तानचे ४ जवान जखमी देखील झाले आहेत.


पाकिस्तानकडून सतत सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतं. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून पाकिस्तानचे सैनिक त्यांना मदत करतात. पण भारतीय जवान त्यांचा हा प्रयत्न नेहमी हाणून पाडतात.


‘तोवर लष्कर शांत बसणार नाही’


लष्कर प्रमुखांनी जम्मू काश्मीरबाबत आपली मतं पुन्हा नोंदवली. जोवर जम्मू काशमीरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही तोवर भारतीय लष्कर शांत बसणार नाही. खो-यात शांत प्रस्थापित करण्यासाठी रणनिती तयार करणं आवश्यक आहे, सैन्य अभियानं वाढवणं गरजेंच आहे असंही ते म्हणाले.