पंतप्रधानांच्या नावावर फसवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
देशात झटपट पैसा मिळवून देण्याचं लोभ दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आता तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करत नागरिकांना लुबाडण्यात आल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : देशात झटपट पैसा मिळवून देण्याचं लोभ दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आता तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करत नागरिकांना लुबाडण्यात आल्याचं समोर आलं आहे.
पंतप्रधानांच्या नावावर कथित कर्ज योजनेच्या नावावर सामान्य नागरिकांना लुबाडणाऱ्या व्यक्तीविरोथात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयातून जवळपास ११ महिन्यांपूर्वी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या नावाचा चुकीचा वापर करण्यात आला असल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं.
तक्रारीनुसार, योजनेतील आरोपींनी कथित स्वरुपात गेल्यावर्षी ११ जुलै रोजी देशातील एका मुख्य वर्तमानपत्रात या योजनेची जाहिरात दिली होती. ज्यामध्ये पंतप्रधान जन कल्याण योजने अंतर्गत कर्ज देण्याचं म्हटलं होतं. तसेच कुणीही व्यक्ती www.satyamgroup.org वर लॉगिन करुन कुठल्याही शुल्काशिवाय, शून्य व्याजदरासह आणि कुठल्याही जामिनाशिवाय कर्ज घेऊ शकतो. हे कर्ज १२ तासांच्या आत नागरिकांना मिळू शकेल.
यामध्ये आरोप केला आहे की, हा संपूर्ण प्रकार म्हणजे फसवणूक केली आहे ज्यामध्ये पंतप्रधानांच्या नावाचा चुकीचा वापर केला आहे.