मुंबई : फेसबुकवर तुम्हाला अशा अनेक सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या असतील, त्यांचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, अशा सुंदर मुलीला तुमच्याशी मैत्री करायची आहे. अशा परिस्थितीत, काहीही विचार न करता, तुम्ही तिला तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये समाविष्ट करता. परंतु त्या सुंदर चेहऱ्याच्या पाठीमागे नक्की काय लपलंय याची मात्र जाणीव नसते. मग अशा सुंदर मुली फोसबुकवरती चॅट करुन लोकांना त्यां च्या प्रेमात पडताता. त्यानंतर या सुंदर सुंदरी कधीकधी अशा काही गोष्टी करतात की, ते समोरील व्यक्तींना त्यांची कमाई यांच्या हाती सोडावी लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने राजस्थानच्या भरतपूर येथून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून देशभरातील लोकांशी मैत्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे.


हे लोक चॅटिंगद्वारे, समोरील व्यक्तीचा मोबाईल नंबर घ्यायचे आणि नंतर त्यांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्यासोबत अश्लील गोष्टी बोलायचे आणि समोरील व्यक्तीला अश्लील चाळे करायला लावून त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचे.


नंतर ते त्या व्हिडीओला सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली पिडितांकडून पैशांची मागणी करायचा, जर कोणी त्याच्या फसवणूकीला घाबरत नसेल, तर त्याला दुसऱ्या काही नंबरवरून फोन करून पोलीस अधिकारी असल्याचे भासवून आणि भिती दाखवून त्यांच्याकडूव पैशांची मागणी करायचा.


सायबर सेलकडून पर्दाफाश


दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे अशाच प्रकारच्या 9 तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करताना सायबर सेलला कळले की, हकीमुद्दीन, राजस्थानच्या भरतपूरचा रहिवासी, त्याच्या सहकाऱ्यांसह फेसबुकवर मुलगी असल्याचे भासवत लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा आणि त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. तो लोकांना अश्लील काम करायला लावायचा आणि मग त्यांचे व्हिडीओ तो रेकॉर्ड करुन त्यांना ते व्हिडीओ मित्रमंडळींना पाठवायची धमकी द्यायचा आणि यातून त्यानं 1 लाख 96 हजार वसूल केले.


या प्रकरणाबाबत तक्रार प्राप्त होताच, सायबर सेलचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी एसीपी रमण लांबा यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आणि या तक्रारीवर काम करण्यास सुरुवात केली. राजस्थानमधील भरतपूर येथून आसामच्या पत्त्यावर जारी केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे अशा घटना घडत असल्याचे सायबर सेलला तपासादरम्यान समजले.


तपासात असे आढळून आले की, हे लोक त्यांच्या पीडितांना अडकवण्यासाठी आणि त्यांना घाबरवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने True कॉलरवर ते क्रमांक नोंदवत असत.


या तपासानंतर सायबर सेलने हकीमुद्दीनला अटक केली असून, त्याच्या 3 साथीदारांचा शोध अद्याप सुरू आहे.


पोलिसांनी असे प्रकार टाळण्याचे मार्ग सांगितले


दुसरीकडे, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी लोकांना फसवणूकीपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच जर कोणी या अशा लोकांच्या तावडीत अडकला असाल तर कधीही त्यांची मागणी मान्य करू नका आणि सायबर सेलकडे www.cybercrime.gov.in वर याची तक्रार करा.