बंगळुरु : आज कर्नाटकमध्ये 222 विधानसभा जागांसाठी मतदान होतं आहे. सकाळपासून मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदारांना मतदानासाठी मतदार केंद्रावर आणण्य़ासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरु असतो. कारण मतदान जर चांगलं झालं तर मतदानाच्या निकालावर नक्कीच परिणाम होतो. पण बंगळुरुमधील एका हॉटेलमध्ये अशा मतदारांना फ्रीमध्ये डोसा आणि कॉफी दिली जात आहे ज्यांना पहिल्यांदा मतदान केलं आहे. यासाठी फक्त आयडी आणि बोटावर लावलेली शाई मतदारांना दाखवावी लागत आहे. हॉटेल मालकाचं म्हणणं आहे की, या ऑफरमुळे युवा वर्गाला मतदानासाठी प्रोत्साहन करण्याचा हेतू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी झाली फ्री डोसा आणि कॉफीची सुरुवात


मीडिया रिपोर्ट्सनुसार निसारगा ग्रँड प्योर हॉटेलच्या मालकाचं म्हणणं आहे की, अनेक लोकं हा विचार करुन मतदान करतात की, वोट करुन त्यांना काय मिळणार आहे. त्यांना कोणत्याही राजकीय नेत्यावर भरोसा नसतो. मालक कृष्णा राज म्हणतात की, मतदान करणं महत्त्वाचं आहे. मला याने फरक नाही पडत की कोण कोणाला मतदान करत आहे. फक्त मतदान करण महत्त्वाचं आहे. हे हॉटेल विधानसभेच्या समोर आहे. त्यामुळे येथे अनेक राजकीय चर्चा होतात. एकदा एक ग्राहक आला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मतदान करु नका असं सांगू लागला. पण मी त्याच्यासोबत जाऊन बोलला आणि त्याला सांगितलं की हा तुमचा अधिकार आहे. तर त्या ग्राहकाने म्हटलं की, जर मी मतदान केलं तर तुम्ही मला फ्रीमध्ये डोसा आणि कॉफी देणार का? त्यानंतर या ऑफरची सुरुवात झाली.


कृष्णा राज यांच्या या ऑफरचं लोकांकडून कोतूक होत आहे. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी हा चांगला उपक्रम असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 224 पैकी 222 जागांसाठी आज मदतान होतं आहे. 15 मेला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठापणाला लावली आहे. कर्नाटकात काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवते की भाजप येथे ही काँग्रेसचा पराभव करतो हे 15 मेलाच कळणार आहे.