Chhattisgarh Crime News: छत्तीसगढच्या अंबिकापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुलीच्या आत्महत्येनंतर तिने हे टोकाचे पाऊल का उचलले असा सवाल उपस्थित होत होता. याचे कारण अखेर समोर आले आहे. मुलीच्या आत्महत्येचे कारण धक्कादायक असून ते ऐकून पोलिसही हादरले आहेत. सोशल मीडियामुळं मुलीने हे पाऊल उचलले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन महिन्यांपूर्वी एका मुलीने 11वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. या फोटोवर अश्लील टिप्पणीदेखील करण्यात आली होती. या घटनेमुळं विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला होता. फोटोवर अश्लील कमेंट केल्यामुळं ती नैराश्यात गेली होती. यातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. अंबिकापूर शहरातील मठपारा येथे ती तिच्या मामाच्या घरी राहून शिक्षण घेत होती. या प्रकरणात मणिपुर पोलिसांनी त्या तरुणीला अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी आणि त्या तरुणीचे एकाच मुलासोबत सोशल मीडियावर बोलणे होत होते. विद्यार्थिनी त्याच्यासोबत फिरायलादेखील जात होती. याचाच राग आरोपी तरुणीला होता. त्यामुळं तिने विद्यार्थिनीला बदनाम करण्याच्या हेतूने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करुन अश्लील अश्लील कमेंट केल्या होत्या. या घटनेने विद्यार्थिनी पू्र्णपणे खचून गेली होती. 


अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोलक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 11वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनी तिच्या मामाच्या घरात राहून शिक्षण पूर्ण करत होती. तीन महिन्यापूर्वी तिचे मामा-मामी घरी नव्हते. त्याचवेळी विद्यार्थिनीसोबत तिची मोठी बहिण होती. त्याचवेळी 12 डिसेंबर रोजी तिने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेची चौकशी करत होती. त्यावेळी तपासात समोर आले की, आरोपी मुलीकडून विद्यार्थिनीचा फोटो अपलोड करुन अश्लील टिप्पणी करण्यात आली होती. यामुळंच तिने आत्महत्या केली. 


पोलिसांनी अधिक तपास करताच तिच्या आत्महत्येचे कारण समोर आले. पोलिसांनी आरोपी ममता हिला अटक केली आहे. भारतीय कलम 305 आणि 63 आयटी अॅक्टअंतर्गंत तुरुंगात पाठवण्यात रवानगी करण्यात आली आहे.