मुंबई : आज सप्टेंबरचा पहिला महिना सुरू झाला आहे. आर्थिक नियोजन किंवा कामकाजाबाबत हा महिना महत्वाचा आहे.  या महिन्याच्या शेवटी आर्थिक देवाण-घेवाणीशी संबधीत उर्वरित कामे पूर्ण कराव्या लागतील. सप्टेंबर मध्ये पुढील 5 आर्थिक कामकाज पूर्ण न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी सप्टेंबर महिन्यात ही पाच काम पूर्ण करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 इनकम टॅक्स फायलिंग
जर तुम्ही टॅक्स जमा करीत असाल तर हा महिना टॅक्सच्या मानाने महत्वाचा आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही तारीख 31 जुलै वरून 30 सप्टेंबर करण्यात आली होती.


ऑटो डेबिट ट्रान्सॅक्शन
पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2021पासून  तुमच्या बँक अकाऊंटमध्ये डेबिट पेमेंटसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनची गरज पडणार आहे. त्यासाठी आपल्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक करा. म्युच्युअल फंड SIPसाठी ऑटो डेबिट आवश्यक करण्यात आले आहे. 


डिमॅट अकाऊंट KYC
ज्या गुंतवणूकदारांकडे डिमॅट अकाऊंट आहे. त्यांना डिपॉजिटर्सतर्फे सूचित करण्यात आले आहे. 30 सप्टेंबरच्या आधी KYCची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. 


आधार - पॅन लिंक करणे
जर तुम्ही तुमच्या आधार कार्डला पॅन कार्डने लिंक केले नसेल तर, 30 सप्टेंबरपर्यत हे काम पूर्ण करा. अन्यथा पॅन कार्ड बंद रद्द होऊ शकते. बँक अकाऊंट सुरू करण्यासाठी पॅन कार्डचे असणे गरजेचे ठरते.


आधार - PF अकाऊंटला लिंक करणे 
जर तुमचे पीएफ अकाऊंट आधारला लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या पगारातून पीएफ साठी रक्कम जमा होणार नाही. हे काम कंपनीतर्फे देखील करण्यात येते परंतु नोकरदाराने त्याची खात्री करायला हवी.