मुंबई :  1 जुलै म्हणजे गुरूवारपासून काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. 1 जलैपासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या जीवनावर होणार आहेत. तर जाणून जुलै महिन्यात काय होणार आहेत  महत्त्वाचे बदल....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. SBI बँकेच्या ATMमधून पैसे काढणं होईल महाग
State Bank Of Indiaचे ग्राहक ATMमधून चारवेळाचं पैसे काढू शकतात. त्यापेक्षा जास्तवेळा पैसे काढले तर अतिरिक्त पैसे आकारले जातील. चार व्यवहार झाल्यानंतर पाचव्या व्यवहारासाठी तुम्हाला 15 रूपये जास्त भरावे लागतील. 


2. SBI बँकेचं चेकबुक महागणार 
एसबीआय 10 चेकबुकसाठी बीएसबीडी खातेदारांकडून शुल्क घेत नाही. परंतु आता 10 चेकबुकनंतर 40 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. 25 चेक असलेल्या चेकबुकवर 75 रुपये शुल्क आकारले जाईल. जीएसटी शुल्क आपत्कालीन चेक बुकवर 50 रूपये आकारले जातील. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील नवीन सेवा शुल्कापासून सूट देण्यात येईल.


3.Syndicate Bankचा IFSC कोड बदलणार 
सिंडिकेट बँकेचा IFSC कोड 1 जुलैपसून बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेत विलीनीकरण झाल्यामुळे IFSC बदलणार आहे. कॅनरा बँकेने सिंडिगेट बँकेच्या सर्व ग्राहकांना नवा IFSC कोड घेण्यास सांगितलं आहे. कॅनेरा बँकेने नव्या IFSC कोडची संपूर्ण यादी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. 


4. IDBI Bankच्या सेवा महागणार 
बँकेने चेक लीफ शुल्क, बचत खाते आणि लॉकर चार्जमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांना आता फक्त 20 पानांचं चेकबुक मिळाणार आहे. त्यानंतर चेकबुकसाठी 5 रूपये आकारण्यात येतील. 


5. अधिक TDS आकारण्यात येणार 
 2020-21 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी टीडीएस जमा करण्याची तारीख 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु आयकर न भरणा णाऱ्यांना टीडीएस दंडाची अंतिम मुदत 1 जुलैपासून लागू होईल.


6. LPG सिलेंडरचे दर बदलतील 
जून महिन्यात एलपीजी सिलेंडरचे दर स्थिर होते. पण ज्या तेजीने कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत, त्यामुळे जुलै महिन्यात सिलेंडरचे  दर वाढतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


7. ड्रायव्हिंग लायसन्स घरी येणार 
आता तुम्हाला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी RTO मध्ये जाण्याची काही गरज नाही. तुम्ही घरातचं ऑनलाईन टेस्ट देवून लायसन्स तयार करूण घेवू शकता. त्यानंतर तुम्ही जर टेस्ट पास झालात तर घरबसल्या प्रिंट काढता येणार आहे.