मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या १३ दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दरात चढ-उतार झालेला दिसला नाही. शिवाय ३० मार्चपर्यंत तेलाचे दर देखील स्थिर आहेत. जागतिक बाजारामध्ये क्रुड तेलाचे दर ५ टक्क्यांनी घसरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रति बॅरल २५ डॉलरवर पोहोचले आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली :
पेट्रोल - ६९.५९ रूपये  प्रती लीटर
डिझेल -  ६२. २९ रूपये  प्रती लीटर


मुंबई  - 
पेट्रोल - ७५.३  रूपये  प्रती लीटर
डिझेल -  ६५. २१ रूपये  प्रती लीटर


कोलकाता
पेट्रोल - ७२.२९  रूपये  प्रती लीटर
डिझेल -  ६४. ६२ रूपये  प्रती लीटर


चेन्नई
पेट्रोल - ७२.२८  रूपये  प्रती लीटर
डिझेल -  ६५. ७१ रूपये  प्रती लीटर


भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा ग्राहक आहे. परंतू कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी या फटका जागतिक बाजाराला बसताना आहे. परंतू नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी हा महत्त्वपूपर्ण निर्णय घेण्यात असल्याची घोषणा मोदींनी केली.