मुंबई : कोरोनाविषाणूच्या (Coronavirus) संकटाचा देशातील अनेक राज्य करीत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संकटाच्या वाढत्या धोक्यामुळे लसीकरण (vaccination)मोहीम हाती घेतली आहे. 1 मेपासून 18+ लोकांचे लसीकरण ( Corona vaccination) करण्यात येणार आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी लसीकरण उद्यापासून होणार नाही, असेच दिसून येत आहे. कारण अनेक राज्यांनी कोरोना लसचा अभाव असल्याने अनेक राज्यांनी असमर्थता दर्शविली आहे. यात महाराष्ट्र दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि बिहारसह इतर काही राज्यांचा समावेश आहे.  केंद्र सरकारने 1 मेपासून वर्षापासून 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली होती, परंतु आता संपूर्ण देशात एकाच वेळी त्याची अंमलबजावणी होईल असे दिसत नाही.


मध्य प्रदेशात 3 मे नंतरच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ मेपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली गेली आहे, परंतु मध्य प्रेदश राज्यातही हे लसीकरण होणार नाही असेच दिसून येत आहे. लस उपलब्ध  झाली तर सध्या 18+ लोकांना लसी देण्यात सक्षम होईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan)यांनी गुरुवारी सांगितले की, भारत बायोटेक आणि सीरम संस्थेने हे सांगितले आहे की, आम्हाला लस डोस उपलब्ध करुन देता येणार नाही, यामुळे १ मे पासून 18+ वर्षांवरील लोकांची लसीकरण मोहीम होऊ शकत नाही.  तथापि, शिवराज सिंह यांनी 3 मेनंतर लसीकरण कार्यक्रम सुरु करु, असा दावा केला आहे आणि राज्यातील लोकांना मोफत लस देण्याचे सांगितले आहे. 


या राज्यांनीही केली असमर्थता व्यक्त 


बिहारमध्येही १ मेपासून लसीकरण सुरु होणार नाही. लस टंचाईमुळे हा कार्यक्रम थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे झारखंडनेही लसीचा अभाव असल्याचे सांगून लसीकरण थांबविले आहे. दुसरीकडे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे म्हणणे आहे की ते 1 मेपासून लस सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु अद्यापपर्यंत लसांचा संपूर्ण साठा पोहोचलेला नाही. ही लस उपलब्ध झाल्यानंतर १  मे पर्यंत संपूर्ण लसीकरण सुरु होईल


दिल्लीत स्थिती स्पष्ट नाही


दिल्ली सरकारनेही लस नसल्याची समस्या नोंदविली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठकही घेतली असून तीन महिन्यांत दिल्लीतील लोकांना कोरोना लस देण्याची योजना तयार केली आहे. तथापि, 1 मे पासून 18+ लोकांना लस दिली जाईल की नाही याबद्दल परिस्थिती स्पष्ट नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने लस नसल्याबद्दल बोलले आहे, त्यामुळे राजधानीतील तरुणांना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


महाराष्ट्राला खूप डोसची गरज आहे


राज्यातही कोरोना लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे चौथा टप्पा १ मेपासून सुरू होणार नाही, असेही महाराष्ट्राने स्पष्ट केले आहे. लस नसल्यामुळे, मुंबई महापालिकेला आपले जम्बो लस केंद्रही बंद करावे लागले.  आजपासून तीन दिवस हा कार्यक्रम बंद राहणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात लसांचा पुरेसा साठा नाही, अशा प्रकारे लसीकरण सुरू करता येणार नाही. टोपे म्हणाले की लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी किमान पाच दिवस पुरेसा साठा असावा. आम्हाला 20 ते 30 लाख डोस आवश्यक आहेत, त्यानंतर 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण सुरू होऊ शकते.


राज्यांमध्ये 10 दशलक्षाहून अधिक डोस आहेत


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड -19 लसचे एक कोटीपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत आणि येत्या तीन दिवसांत त्यांना 20 लाख अधिक डोस मिळतील. महाराष्ट्राच्या प्रश्नावर मंत्रालयाने स्पष्ट केले की अद्याप लसीकरणासाठी पात्र व्यक्तींना अर्ज करण्यासाठी राज्यात 7,49,960 डोस उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, 29 एप्रिलला महाराष्ट्रात लसचे 1,63,62,470 डोस प्राप्त झाले आहेत.