नवी दिल्ली : जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांची राज्यसभेतील खासदारकी सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडिफ डॉट कॉमच्या हवाल्याने जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, जनता दलात (यू) शरद यादव यांची खासदारकी अपात्र ठरविण्याबाबत विचार सुरू आहे. दरम्यान, जनता दलातील (यू) धूरीनांनी जर हा विचार प्रत्यक्षात उतरवलाच तर, राज्यसभेचे सभापती या नात्याने नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू याबाबत निर्णय घेतील.


दरम्यान, नायडू यांनी जरी यादव यांच्या अपात्रेबाबत लोकांना काय सांगायचे हा प्रश्न जनता दलासमोर (यू) उपस्थित होणार आहे. परंतू, जनता दलासाठी हा निर्णय वाटतो तितका सोप असणार नाही. यात अनेक कायदेशीर अडथळे असती. जे पार करणे जनता दलासाठी कठीण असेन.