मुंबई : आपण बाजारात पाहिलं असेल की, आपल्याला पिवळ्या रंगाची केळी मिळतात. परंतु आपल्याला तपकिरी रंगाची आणि काळे डाग पडलेली केळी देखील बाजारात पाहायला मिळतात. जी आपल्याला दुकारदार कमी किंमतीत देखील द्यायला तयार होतो. जर कोणी विकत घेतली नाहीत, तर परिणामी ही केळी फेकून दिली जातात. हे आपल्या घरातील केळ्यांसोबत देखील होतं. जास्त काळ केळी राहिली की, ती काळी पडायला सुरुवात होतात. जी शेवटी फेकून द्यावे लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या केळींना जास्त न पिकण्यापासून वाचवण्यासाठी दुसरा चांगला पर्याय कोणता आहे, असा अनेकांना प्रश्न पडतो. खरंतर यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे.


शास्त्रज्ञांच्या मते, दरवर्षी सुमारे 50 दशलक्ष टन केळी जगभरात फेकली जातात कारण, त्यांच्यावर तपकिरी रंगाचे ठसे असतात. परंतु आता हा अपव्यय थांबवता येईल. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.


केळी तपकीरी होण्याचे कारण काय आहे?


शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, केळीवरील तपकिरी रंगाचे चिन्ह हे केळी पिकलेली असल्याचे सूचित करतात. परंतु इतर फळांच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. तसे पाहाता सफरचंद कापल्यानंतर तो तपकिरी होऊ लागते, परंतु केळीबाबत तसे होत नाही. केळी न कापताच तपकिरी होऊ लागतात. परंतु ते तपकिरी मार्क्स येण्याचे कारण काही वेगळेच आहे.


डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, केळीच्या सालीमध्ये इथिलीन गॅस असतो. त्यात असलेले क्लोरोफिल ते मोडून टाकते. केळीच्या हिरवटपणासाठी क्लोरोफिल जबाबदार आहे. केळीच्या सालीमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण वाढते आणि ते वातावरणातील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देत असल्याने त्याचा हिरवापणा कमी होतो. यासोबतच यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. त्यामुळे केळीचा गोडवा वाढतो.


केळीमधून फक्त गॅस निघतो आणि त्यामुळेच केळी पिकू लागतात. अशा परिस्थितीत केळीमध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते, त्यामुळे त्यात गोडवा वाढतो आणि काही दिवसांनी ते अधिक पिकते. 


तसेच तुम्ही जर केळीच्या आजूबाजूला दुसरे फळ ठेवलेत, तर ते केळीमुळे पिकू लागतात. त्यामुळे शक्यतो इतर फळांसोबत केळी ठेऊ नका. 


केळीसोबत ठेवलेल्या बहुतांश फळांवर इथिलीन वायूचा परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ, सफरचंद केळीसोबत ठेवल्यानंतर काही तासांनंतर ते पिकलेले दिसतात आणि ते मऊ होऊ लागतात. त्याच वेळी, संत्री, लिंबू आणि बेरी ही अशी फळे आहेत ज्यांना इथेन गॅसचा प्रभाव पडत नाही.