``स्टेशन काय तुझ्या बापाचं आहे?`` असं कोणी विचारलं तर काय करावं? नेटीझन्सकडून सजेशन
तुम्ही आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असणार. एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत कमी किंमतीत पोहोचण्यासाठी रेल्वे आपल्याला मदत करते.
मुंबई : तुम्ही आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असणार. एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत कमी किंमतीत पोहोचण्यासाठी रेल्वे आपल्याला मदत करते. तुम्ही रेल्वेने प्रवास करताना अनेक स्टेशन पाहिली असतील, यांपैकी काही स्टेशनची नावं तुमच्यासाठी ओळखीची असतील, तर काही स्टेशनची नावं आपल्याला नव्याने ऐकू येतात. अशीच काही स्टेशनची नावं सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत, जी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.
अनेकवेळा इथे राहणारेच लोक या नावांवर हसतात. ही स्टशन कोणती आहेत, हे जाणून घेऊ या.
प्रथम राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया. येथे जोधपूरला 'साली' नावाचं रेल्वे स्टेशन आहे. हे अजमेरपासून सुमारे 53 किमी आहे. ते उत्तर-पश्चिम रेल्वेला जोडलेले आहे.
त्याच वेळी, उदयपूरजवळ एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचे नाव 'नाना' आहे. हे सिरोही पिंडवाडा येथे आहे. हे स्थानक उत्तर-पश्चिम रेल्वेच्या जोधपूर विभागात आहे. हे स्टेशन राजस्थानमधील पोखकरच्या अगदी जवळ आहे.
चला आणखी एका विचित्र रेल्वे स्टेशनच्या नावाबद्दल जाणून घेऊ या.
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्याजवळ बाप नावाचे एक रेल्वे स्टेशन आहे, जे सोशल मीडियावर चर्चेत आहेत, कारण येथे उतरल्यावर लोक फोटो काढण्यासाठी कधीही विसरत नाहीत.
अनेकांनी तर सोशल मीडियावर या स्टेशनच्या नावासोबत सेल्फी घेऊन लिहिलं आहे की, "जर कोणी मला विचारलं की, स्टेशन काय तुझ्या बापाचं आहे? तर मी त्यांना हा फोटो दाखवेन...." तेसेच लोकांनी या स्टेशनच्या नावावरुन खूप काही मीम्स बनवले आहे.
तसेच अशा पद्धतींची नावं वाचून एका युजरने गंमतीने असं देखील म्हटलं आहे की, "इथे आल्यावर आपल्या माणसांना भेटल्याची जाणीव होते."
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात असे एक रेल्वे स्टेशन आहे, ज्याचे वाचून लोक खिल्ली उडवतात. 'ओढनिया चाचा' असे या रेल्वे स्टेशनचे नाव आहे. हे स्टेशन जैसलमेरपासून ९३.६ किमी अंतरावर आहे. राजस्थानमध्ये अशी आणखी बरीच रेल्वे स्थानके आहेत, ज्यांची नावे खूप प्रसिद्ध आहेत - जसे की गुडिया, फलाना, बस्सी इ.