Hindu Wedding Rituals: लग्न म्हंटलं की भारतात आनंद सोहळा असतो. नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येण्यासाठीच निमित्त ठरतं. खूप दिवसानंतर भेट झाल्याने आनंदी सोहळा असतो. अनेक जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला जातो. लग्नसोहळ्यात फोटो आणि व्हिडीओग्राफर महत्त्वाची भूमिका बजावतो. सर्व क्षण आपल्या कॅमेऱ्यात चित्रित करत असतो. त्यामुळे लग्नसोहळ्यातील (Marriage Event) आठवणी कालांतराने पुन्हा जागा करता येतात. हल्ली तर प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असल्याने फोटो क्लिक केल्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड होतात. सोशल मीडियामुळे (Social Media) लग्नातील काही क्षण वेगाने व्हायरल होतात. असे अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. एक वधू रडत असून तिची जबरदस्तीने सासरी रवानगी केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

bridal_lehenga_designn या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 9 तासातच या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. वधुला एका जोडप्याने मंडपातून उचलून आणलं आणि तिला थेट गाडीत बसवलं. यावेळी वऱ्हाडी मंडळी आसपास उभे असल्याचं दिसतं.



Video: काही सेकंदात अजगरानं शिकार केली फस्त! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


एका युजर्सने लिहिलं आहे की, अशीच रवानगी मला प्रत्यक्षात पाहायची आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, हसू पण येत आहे आणि वाईट देखील वाटत आहे. बॅकग्राउंड गाणं पण भारी निवडलं आहे. त्यामुळे अजून हसू येत आहे.