मित्रांसमोर स्टाईल मारणं तरुणीला पडलं महागात...अखेर सगळ्यांसमोर तोंड काळं करण्याची वेळ, पाहा व्हिडीओ
सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंटेन्ट पाहायला मिळतात.
मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंटेन्ट पाहायला मिळतात. यामध्ये काही फोटो, काही व्हिडीओ, तर काही मीम्स खरोखरचं खूप मनोरंजक असतात. त्यात लोकं आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी वेगवेगळे आणि युनिक कंटेन्ट शोधून आणतात, ज्यामुळे ते लोकांचे मनोरंन करु शकतील. मग यासाठी गे लोकं काहीही करण्यासाठी तयार होतात. तसेच आजची तरुण मंडळी, उत्साहात मागचा पुढचा काहीही विचार न करता किंवा कोणतीही ट्रेनिंग न घेतात. समोरील व्यक्तींना कॉपी करतात किंवा स्टंट करतात.
यात काही नशीबवान, फारच कमी लोकं यशस्वी ठरतात. परंतु बऱ्याच लोकांना असे स्टंट करणं महागात पडते.
सध्या सोशल मीडियावर तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीसोबत एक मजेदार किस्सा घडला. हा व्हिडीओ जितका फनी आहे तितकाच थक्क करणाराही आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी नाला पार करण्यासाठी काठीचा वापर करते. खरंतर हा तिचा स्टंट करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. पण, मधेच तिचा तोल बिघडतो आणि नंतर तिच्यासोबत जे घडते ते खरोखरचं हस्यासपद आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी नाल्याजवळ काठीने उभी आहे. त्याचवेळी दुसरी मुलगी धावत येऊन काठीच्या साहाय्याने नाला पार करू इच्छिते. पण, अचानक तिचा तोल बिघडतो आणि ती थेट नाल्यात पडते.
ज्यानंतर या मुलीच्या कपड्यांपासून ते चेहऱ्यापर्यंत सगळ्याचाच रंग बदलतो. या मुलीची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित तिचे मित्र देखील खूप हसायला लागतात. नाल्यातून बाहेर आल्यानंतर त्या मुलीची अवस्था अत्यंत वाईट दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, सोबतच लोक त्यावर आपल्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत.
हा व्हिडीओ आतापर्यंत 44 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर सुमारे एक हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ '@HldMyBeer' नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की लोक तो इतर पेजवर देखील शेअर करत आहेत.
काही युजर्स या मुलीच्या या अतिशहाणपणाबद्दल बोलत आहेत, तर काही लोकं यामुलीला झालेल्या दुखापतीबद्दल बोलत आहेत. पण काहीही असो, तुम्ही हे असे व्हिडीओ पाहून त्यातुन शिकवण घ्या आणि असं कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी 10 वेळा विचार करा.