मुंबई : Girl Funny Video: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजकाल बरेच युजर्स सक्रिय असतात. अनेक लोक मनोरंजनासाठी सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ बनवतात. असाच एक व्हिडिओ सध्या पाहायला मिळत असून सध्या सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीचे तिच्या प्रियकरासोबत जुळताहेत 36 गुण
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्याने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. आयपीएस अधिकाऱ्याने लिहिले, 'पालकांपेक्षा मुलांना कोण चांगलं समजू शकतं!' खरंतर या व्हिडिओमधील मुलगी आपल्या मित्रांना सांगतेय की, तिच्या घरच्यांनी तिच्या प्रियकरासोबत लग्न करू दिले नाही. 



व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या पालकांबाबत तक्रार करताना दिसतेय. येथे तीन मुली आपल्या मैत्रिणींसोबत बसल्या असून एक मुलगी दुःखी होऊन म्हणते की, 'माझे आणि माझ्या प्रियकराचे 36 पैकी 36 गुण जुळले, परंतु तरीही माझ्या घरच्यांनी आमचे लग्न केले नाही, ते म्हटले की आमची मुलगी जितकी खट्याळ आहे, तेवढा खट्याळ जावई नको.


 हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. या व्हिडिओला आतापर्यंत 6 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.