गंगाजल वर्षानुवर्षे खराब का होत नाही? थक्क करणारे कारण
Gangajal : गंगाजल कधीही सडत नाही किंवा नाही किंवा त्यातून दुर्गंधी येत नाही. जाणून घेऊया वैज्ञानिक कारण.
Ganga River: हिंदू धर्मात गंगाजल (Gangajal) अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात गंगाजलला विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून गंगा नदीला माता मानून तिचे पाणी अमृत मानले जाते. गंगा मातेला मोक्षदाता म्हणतात. यामुळेच मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकण्याची परंपरा रुढ झाली आहे. गंगा मातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ते कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाहीत. गंगाजल वर्षानुवर्षे खराब का होत नाही? जाणून घेऊया वैज्ञानिक कारण.
हे देखील वाचा... नाग नागिन नाही तर कावळा घेतो माणसांचा बदला; 17 वर्ष लक्षात ठेवतो चेहरा; संशोधनातून झाले सिद्ध
गंगा मातेच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन शुद्ध होतात अशी मान्यता आहे. यामुळेच गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. कुंभ मेळा तसेच हिंदू धर्मातील अनेक महत्वपूर्ण सणांच्या दिवशी लाखो भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात. हिंदू धर्मातील विविध पूजेतही पवित्र गंगाजल वापरले जाते. अनेकांच्या घरात तसेच देवघरात गंगाजल पहायला मिळते. वर्षानुवर्षे ठेवले तरी गंगाजल खराब होत नाही.
वर्षानुवर्षे तसेच ठेवले तरी खराब न होणाऱ्या गंगाजलाच्या शुद्धतेमागे अनेक वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. गंगाजलमध्ये असलेल्या बॅक्टेरियोफेज मुळे हे पाणी कधीच खराब होत नाही. गंगाजलची शुद्ध टिकवून ठेवण्यात बॅक्टेरियोफेज हे महत्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) गंगाजलच्या शुध्दतेबाबत संशोधन केले. या संशोधनानुसार, गंगा नदीच्या पाण्यात आढळणारे बॅक्टेरियोफेजेस हे विशेष प्रकारचे विषाणू आहेत. बॅक्टेरियोफेजेस पाण्यात असलेले
हानिकारक जीवाणू नष्ट करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर बॅक्टेरियोफेजेस गंगेच्या पाण्यात नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतात. बॅक्टेरियोफेजेस मुळे पाणी शुद्ध आणि तसेच खराब होण्यापासून सुरक्षित राहते. इतर नद्यांच्या तुलनेत गंगा नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिला आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असल्यामुळे पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे पाणी खराब होत नाही तसेच दुर्गंधी देखील येत नाही. गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या विशेषत: हरिद्वार आणि ऋषिकेशसारख्या ठिकाणी ऑक्सिजन मोछ्या प्रमाणात असतो. यामुळेच या ठिकाणचे पाणी सर्वात पवित्र मानले जाते.
गंगाजल दीर्घकाळ घरात ठेवण्याचे अनेक फायदे देखील आहेत. हे नैसर्गिकरित्या शुद्ध असल्यामुळे त्यात बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजीव वाढू शकत नाहीत. धार्मिक मान्यतेनुसार, गंगाजल घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील वातावरण पवित्र आणि शांततापूर्ण राहते. गंगाजल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. प्राचीन काळी गंगाजल औषध म्हणून वापरले जात होते. गंगाजलचा नियमित वापर केल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळेच गंगेचे पाणी विशेष मानले जाते.